Thursday, June 12, 2025

कणकवलीत तीन ग्रामपंचायती भाजपकडे बिनविरोध

कणकवलीत तीन ग्रामपंचायती भाजपकडे बिनविरोध

आमदार नितेश राणे यांच्या गाव विकासाच्या संकल्पनेला जनतेचा पाठिंबा


कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने यशस्वी घोडदौड सुरू केली आहे. आमदार नितेश राणे यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे तालुक्यातील शिडवणे आणि वायंगणी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध भाजपकडे आल्या आहेत.


शिडवणे ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपचे जिल्हा चिटणीस रवींद्र शेट्ये बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आले आहेत. त्यांना गावातून भाजपचा सरपंच म्हणून बिनविरोध निवडून दिले आहे तर वायगणी सरपंच पदी भाजपच्या अस्मी लाड या बिनविरोध निवडून आल्या आहेत.


तर ओझरम सरपंचपदी भारतीय जनता पार्टीच्या समृद्धी राणे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांनाही गावातील जनतेने भाजपचा सरपंच म्हणून बिनविरोध निवडून दिले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने विजयी सलामी दिली आहे.


शिडवणे येथील ग्रामपंचायत वर सरपंच म्हणून रवींद्र शेट्ये हे बिनविरोध निवडून आले. तर तर प्रभाग एक मधून कोमल कृष्णा शेटये, दीपक जीवबा पाटणकर, प्रभाग दोन मधून दयानंद दिनकर कुडतरकर, शांताराम यशवंत धुमाळ, सुप्रिया पांचाळ, प्रभाग तीन मधून राजश्री गोकुळ शिरसेकर, स्मिता मनोहर टक्के, सुप्रिया योगेश पाष्टे, यांची बिनविरोध निवड झाली आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे हे सर्व उमेदवार विरोधी उमेदवार नसल्यामुळे बिनविरोध निवडून आले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >