Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीBigg Boss : 'या' सनी आणि बंटीकडे सोन्याचा मोबाईल, सोन्याची कार आणि...

Bigg Boss : ‘या’ सनी आणि बंटीकडे सोन्याचा मोबाईल, सोन्याची कार आणि अंगावर १२ किलो सोन्याचे दागिने!

मुंबई : बिग बॉस १६ मध्ये (Bigg Boss) गोल्डन गाईज नावाने प्रसिद्ध असलेल्या सनी नानासाहेब वाघचौरे आणि त्याचा मित्र बंटी गुर्जर यांची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. सोशल मीडियावर या दोघांनी धुमाकुळ घातला आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत.

सनी आणि बंटी कोट्यवधी रुपयांचे सोने परिधान करतात आणि अतिशय लक्झरी लाईफ जगतात. ‘बिग बॉस १६’ मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेणाऱ्या सनीचे पूर्ण नाव सनी नानासाहेब वाघचौरे आहे आणि बंटीचे पूर्ण नाव संजय (बंटी) गुर्जर आहे. सनी आणि बंटी खूप चांगले मित्र आहेत, तसेच ते अनेक ठिकाणी एकत्र जातात. सनी आणि बंटी हे फिल्म फायनान्सर आणि निर्माते आहेत. ते अनेक प्रसंगी सलमान खान, विवेक ओबेरॉय आणि इतर अनेक सेलिब्रिटींसोबत दिसतात. त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोताबाबत त्यांना विचारले असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.

“आम्ही दोघे पुण्याचे रहिवासी आहोत. मी आणि बंटी लहानपणापासून एकत्र आहोत आणि आम्हा दोघांनाही लहानपणापासूनच सोने घालण्याची आवड आहे. आम्ही मित्र असू शकतो पण आमच्यात भावासारखं प्रेमदेखील आहे. आम्ही नेहमी एकत्र राहतो. आमच्यातील असलेल्या प्रेमापोटी लोकांनी आम्हाला ‘गोल्डन गाईज’ हे नाव दिले आहे.

सनीने सांगितले की, “लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की मी इतके सोने कसे घालतो. म्हणून मी सांगू इच्छितो की जर तुम्ही खूप दिवसांपासून एखादे काम करत असाल तर तुम्हाला त्याची सवय होते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती जीममध्ये व्यायाम करण्यासाठी जात असेल आणि तो १०० किलो वजन उचलत असेल, तर त्याला पाहून नवीन लोक म्हणतील की तो इतका वजन कसा उचलतोय? मग तोच माणूस हळूहळू सराव करेल तेव्हा तो स्वतः १०० किलो वजन उचलू शकेल. तसेच मीही लहानपणापासून सोनं घातले आहे. कालांतराने मी सोन्याच्या दागिन्यांचे वजन वाढवले.

मी आज जवळपास सात किलो सोनं घालतो आणि बंटी पाच किलो सोनं घालतो. तुम्हाला ऐकायला अजब वाटेल की इतकं वजन घेऊन कोणी कसं चालू शकतं. पण त्यात कोणतीही समस्या येत नसल्याचे सनीने सांगितले.

गोल्डन गाईजकडे अनेक लक्झरी कार्स आहेत. मुंबई-पुण्याच्या रस्त्यांवर अनेकवेळा त्यांची सोन्याची चमकणारी कार पाहण्यासाठी गर्दी होते. त्यांच्या गाडीसोबत अंगरक्षकांची दोन वाहनेही आहेत. त्यांच्याकडे जग्वार एक्सएफ कारही आहे. त्यांच्या बेस मॉडेलची ऑन-रोड किंमत सुमारे ८९ लाख आहे. कारच्या बॉडीशिवाय टायर आणि इंटिरिअरही सोन्याच्या मिश्रीत धातूपासून बनवलेले आहेत.

याशिवाय सनी आणि बंटी यांच्याकडे टॉप-ऑफ-द-लाइन ऑडी क्यू७ देखील आहे. जी त्यांनी काही वर्षांपूर्वीच खरेदी केली होती. या दोघांची ही आवडती कार आहे. या कारच्या बेस व्हेरिअंटची किंमत सुमारे ८३ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

#गोल्डनगाईज कडे #मर्सिडीज बेंझ ई-क्लास देखील आहे ज्याच्या नंबर प्लेटवर त्यांचे नाव लिहिलेले आहे. ई-क्लास मर्सिडीज ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या लक्झरी कारपैकी एक आहे. त्याची किंमत ६७ ते ८७ लाखांच्या दरम्यान आहे.

#goldenguys #biggboss #wildcardentry

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -