Wednesday, July 24, 2024
Homeमहत्वाची बातमीZombie virus : रशियात झोम्बी व्हायरस सापडला; फ्रेंच शास्त्रज्ञांकडून पुनरुज्जीवित

Zombie virus : रशियात झोम्बी व्हायरस सापडला; फ्रेंच शास्त्रज्ञांकडून पुनरुज्जीवित

मॉस्को : रशियामध्ये गोठलेल्या एका तलावाखाली असलेल्या ४८,५०० वर्षे जुन्या ‘झोम्बी व्हायरस’ (Zombie virus) ला पुन्हा जिवंत केल्याचा दावा फ्रेंच शास्त्रज्ञांनी केला आहे.

आजपर्यंत हे विषाणू जणू बर्फाखाली कैद होते मात्र ते आता पुनरुज्जीवित झाल्याने साथीच्या आणखी एका आजाराची भीती निर्माण झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे हा आजार संसर्गजन्य असू शकतो.

प्राथमिक अहवालानुसार, ग्लोबल वॉर्मिंगमुळे उत्तर गोलार्धाचा एक चतुर्थांश गोठलेली जमीन वितळत आहे. यामुळे लाखो वर्षांपासून त्याखालील गोठलेले सेंद्रिय पदार्थ बाहेर पडतात, माहितीनुसार त्याखाली अनेक घातक सूक्ष्मजंतू असतात. संशोधकांचे म्हणणे आहे की, वितळणाऱ्या बर्फाच्या या सेंद्रिय पदार्थाच्या भागामध्ये लपलेले सूक्ष्मजंतू तसेच वर्षानुवर्षे जिवंत असलेले विषाणू यांचा धोका सर्वाधिक असतो.

यातील सर्वात जुन्या विषाणूला पँडोव्हायरस येडोमा म्हणून ओळखण्यात येणार आहे. हा विषाणू तब्बल ४८,५०० वर्षे जुना असल्याचं संशोधकांच्या संघाने म्हटलं आहे. याच संघाने २०१३ मध्ये अशाच एका प्राचीन विषाणूचा शोध लावला होता. जो, ३०,००० वर्षं जुना होता. पँडोव्हायरसने या विषाणूचा विक्रमही मोडला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -