Sunday, July 14, 2024
Homeमहत्वाची बातमीSea Swimming competition : मालवणमध्ये १७, १८ डिसेंबरला राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा

Sea Swimming competition : मालवणमध्ये १७, १८ डिसेंबरला राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा

मालवण (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या वतीने बारावी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा (Sea Swimming competition) १७ आणि १८ डिसेंबर या दोन दिवशी मालवण चिवला बीचच्या समुद्रात आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिपक परब आणि सचिव राजेंद्र पालकर यांनी दिली आहे.

स्पर्धेत २६ जिल्ह्यांतून १५०० स्पर्धक सहभागी होणार आहेत. राज्यभरात अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या या जलतरण स्पर्धेसाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्यासह लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय नेते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेच्या नियोजनाची बैठक सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिपक परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राजेंद्र पालकर, उपाध्यक्ष बाबा परब, निल लब्दे, डॉ. राहुल पंतवालावलकर, सुनील मयेकर, युसूफ चुडेसरा, राकेश पवार आणि अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेसाठी मालवण येथे येणाऱ्या स्पर्धकांचे रजिस्ट्रेशन १६ डिसेंबर रोजी मामा वररेकर नाट्यगृह येथे होणार असल्याचे सांगण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -