शिवरायांची कोणाशी तुलना केली नाही, फक्त उदाहरण दिले

Share

मुंबई : मी जे वक्तव्य केलं त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही केलेली नाही. मी फक्त उदाहरण दिलं होतं. आणि महाराष्ट्रामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देणार नाही तर कोणाचं देणार? प्रतापगडावर भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पहिल्यांदाच संपूर्ण सरकार तिथे होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आणि त्यांच्या तत्वांवर चालण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मीच काय कोणीही आणि कधीच करू शकत नाही, असं म्हणत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी निर्माण झालेल्या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण आपण लहान मुलांनाही देतो. आणि मी उदाहरण दिलं होतं. कोणाशीही तुलना करण्याचा या मागे माझा हेतू नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज हे सूर्य आहेत आणि आम्ही जमिनीवर आहोत. यामुळे त्यांच्याशी तुलना करण्याचा मूर्खपणा कोणीच करू शकत नाही. मीही कधीच करत नाही, असं लोढा यांनी स्पष्ट केलं. यामुळे यावर कोणीही राजकारण करू नये, हा राजकारणाचा विषय नाही, ही सर्वांना विनंती आहे. यावरील राजकारण थांबवा, असं आवाहन मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांवर एवढचं प्रेम होतं, तर मग तुम्ही प्रतापगडावरील अफजलखानच्या कबरीजवळचे अतिक्रमण सत्ता असताना इतक्या वर्षांत का हटवले नाही? आमचं सरकार येताच आम्ही अतिक्रमण हटवलं, असं म्हणत लोढा यांनी राजकारण करणाऱ्या विरोधकांना टोला लगावला आहे.

Recent Posts

Fawad Khan : पहलगाम हल्ल्यानंतर सरकारचा अ‍ॅक्शन मोड! फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटावर घातली बंदी

मुंबई : पहलगाम हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट…

27 minutes ago

Pahalgam Terror Attack: खारट फ्राईड राईसने वाचवला ११ जणांचा जीव

जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या एका कुटुंबासाठी खारट फ्राइड राईस जीवदान ठरले मुंबई: पहलगामच्या बैसारण येथे…

56 minutes ago

Indus Waters Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिलेला सिंधू पाणी करार काय आहे?

सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…

1 hour ago

Summer Tree : उन्हाळ्यात घरातील बाग किंवा कुंड्यांना असं ठेवा ताजंतवानं!

उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आपल्या घरातली बाग किंवा कुंड्यांमधली झाडं मदत करतात. पण या उन्हाच्या झळा…

2 hours ago

भारताचा डिप्लोमॅटिक स्ट्राईक, पाकिस्तानच्या चिंतेत वाढ

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करुन २६ पर्यटकांना ठार…

2 hours ago

हीच योग्य वेळ, आता भारताने पाकिस्तानच्या नरडीचा घोट घेतला पाहिजे; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचे ठाम मत

नवी दिल्ली/वॉशिंग्टन : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही संताप उसळला आहे.…

2 hours ago