Sunday, May 4, 2025

देशमहत्वाची बातमी

Digital Rupee : डिजिटल रुपया वापरायचा कसा?

Digital Rupee : डिजिटल रुपया वापरायचा कसा?

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व बँक उद्या म्हणजे एक डिसेंबरला रिटेल डिजिटल रुपया (Digital Rupee) लाँच करणार आहे. याचा पहिला पायलट प्रोजेक्ट होणार आहे. यात रुपयाचे निर्माण, डिस्ट्रीब्युशन, रिटेल वापर याच्या संपूर्ण प्रक्रीयेचे टेस्टिंग केले जाणार आहे. यापूर्वी केंद्रीय बँकेने १ नोव्हेंबरला होलसेल ट्रँझॅक्शनसाठी डिजिटल रुपया लाँच केला होता. (How to use Digital Rupee)

रिझर्व बँकने या डिजिटल करंसीला सेंट्रल बँक डिजिटल करंसी (CBDC) नाव दिले आहे. १ डिसेंबरपासून ठराविक ठिकाणी हा रुपया चलनात आणला जाणार आहे. यात ग्राहकापासून ते मर्चंटपर्यंत सर्वांचा समावेश असेल.

ई-रुपी (e₹-R) डिजिटल टोकनचे काम करेल. सेंट्रल बँक डिजिटल करंसी (CBDC) भारतीय रिझर्व बँकेकडून आणल्या जाणाऱ्या करंसी नोटांचे डिजिटल स्वरुप असणार आहे. ही करंसी नोटांप्रमाणेच पूर्ण वैध समजली जाणार आहे. याचा वापर व्यवहारासाठी केला जाईल.

e₹-R चे वितरण बँकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. डिजिटल वॉलेटद्वारा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला किंवा विक्रेत्याला ते देऊ शकाल. तुमच्या फोनमध्ये ज्या बँकेचे अ‍ॅप असेल त्या बँकेच्या डिजिटल वॉलेटमधून तुम्ही व्यवहारासाठी हा रुपया वापरू शकाल. यासाठी तुम्ही क्यूआर (QR) कोड्स स्कॅन करून व्यवहार करू शकता.

पायलट प्रोजेक्टमध्ये ८ बँकांचा समावेश असणार आहे. पण पहिल्या स्तरातली सुरूवात देशातल्या चार शहरांत SBI, ICICI, यस बँक आणि IDFC फर्स्ट बँकेच्या माध्यमातून होईल. यानंतर बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक या पायलट प्रोजेक्टमध्ये सहभागी असणार आहेत.

या नव्या डिजिटल रुपयाला कागदी नोटेच्या रुपया एवढेच महत्व आहे. तुम्हाला हवे तर ही करंसी देऊन तुम्ही नोट घेऊ शकाल. रिझर्व बँकेने या डिजिटल करंसीला CBDC-W आणि CBDC-R अशा दोन गटात विभागण्यात आलं आहे. CBDC-W चा अर्थ होलसेल करंसी आहे. तर CBDC-R चा अर्थ रिटेल करंसी आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला डिजिटल करण्यासाठी उचललेले हे पाऊल महत्वपूर्ण समजले जात आहे.

Comments
Add Comment