Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडीमहत्वाची बातमी

state government : मोठा निर्णय; पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर

मुंबई : राज्यातील पोलीस भरतीसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांना राज्य सरकारने (state government) मोठा दिलासा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे.


अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पोलीस भरती बाबत आमच्याकडे ११ लाख ८० लाख अर्ज आले आहेत. पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून तक्रारी समोर आल्या होत्या.


त्यानंतर आता पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढवण्यात आली असल्याचा निर्णय झाला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. पोलीस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरताना आलेल्या सर्व अडचणी दूर करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Comments
Add Comment