Friday, May 9, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

BMC : रस्ते काँक्रिटीकरणासाठीच्या नवीन निविदांमध्ये वाढ

BMC : रस्ते काँक्रिटीकरणासाठीच्या नवीन निविदांमध्ये वाढ

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी मुंबई महापलिकेने (BMC) मागवलेल्या ५ हजार ८०६ कोटी रुपयांच्या निविदा रद्द केल्यानंतर आता पुन्हा निविदा मागवल्या आहेत. यात १७ टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. ५ हजार ८०६ कोटींच्या तुलनेत ६ हजार ७९ कोटी रुपयांच्या निविदा आहेत. तर कंत्राटदारांच्या सोयीने सुधारित निविदा काढल्या असल्याची चर्चा सुरू आहे.


दरम्यान मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी ४०० कि.मी.च्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. यासाठी पालिकेने ५ हजार ८०६ कोटींच्या निविदाही मागवल्या. या निविदेला केवळ ३ ते ४ कंत्राटदारांनी प्रतिसाद दिल्यामुळे त्या निविदा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर पालिकेने नवीन निविदा मागवल्या असून त्यात जीएसटी आकारला नाही. यापुढे ही रक्कम परस्पर कंत्राटदारानेच भरावी अशा प्रकारच्या अटींचा समावेश केल्याने कंत्राट किमतीचा आकार हा ६ हजार ७८० कोटी रुपयांच्या तुलनेत ६ हजार ७९ कोटी रुपये झाल्याचे पहायला मिळत आहे.


प्रिकास्ट पर्जन्य जलवाहिन्या, प्रिकास्ट डक्ट व प्रिकास्ट मॅनहोल तसेच इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सहभाग करून नवीन निविदा मागविण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. प्रिकास्ट पर्जन्य जलवाहिन्या, प्रिकास्ट डक्ट व प्रिकास्ट मॅनहोल यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यामध्ये शहराकरिता १२३३ कोटी रुपये, पूर्व उपनगरांकरिता ८४६ कोटी रुपये, पश्चिम उपनगरांकरिता १६३१ कोटी रुपये असणार आहेत.

Comments
Add Comment