Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडी

Amazon Company : अ‍ॅमेझॉनचा भारतातील वितरण सेवा बंद करण्याचा निर्णय

Amazon Company : अ‍ॅमेझॉनचा भारतातील वितरण सेवा बंद करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : ई-कॉमर्स क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी अ‍ॅमेझॉन (Amazon Company) बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतातील फूड डिलिव्हरी आणि ई-लर्निंग प्लॅटफॉर्म बंद केल्यानंतर अ‍ॅमेझॉन कंपनीने आता वितरण सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


अ‍ॅमेझॉनची वितरण सुविधा प्रामुख्याने बेंगळुरू, हुबळी आणि म्हैसूर सारख्या शहरांमध्ये होती. कंपनीच्या या सेवेत ५० कर्मचारी काम करत होते. कंपनी तिच्या वितरण सुविधेद्वारे किरकोळ व्यापाऱ्यांना वस्तूंचा पुरवठा करत होती. अ‍ॅमेझॉन वितरण सेवा बंद करण्याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

जगभरात सध्या आर्थिक मंदीचे ढग तयार व्हायला लागले आहेत. याचाच परिणाम म्हणून अ‍ॅमेझॉनचे हे पाऊल मंदीशी जोडून तज्ज्ञ पाहत आहेत. आगामी काळात जागतिक मंदीचा संपूर्ण जगावर वाईट परिणाम होऊ शकतो. मंदीच्या परिस्थिती कंपनी आपला मुख्य व्यवसाय चांगल्या प्रकारे हाताळू शकते, म्हणून ती उर्वरित व्यवसाय बंद करत आहे.

Comments
Add Comment