Saturday, July 5, 2025

Shraddha murder case : आरोपी आफताबवर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न

Shraddha murder case : आरोपी आफताबवर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर मर्डर (Shraddha murder case) प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याच्यावर तलवारीने हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


पॉलिग्राफीनंतर तुरुंगात परत घेऊन जात असताना पोलिस व्हॅनवर दोन जणांनी तलवारीने हल्ला केला. दिल्ली पोलीसांनी दोघांनाही अटक केली आहे.


दिल्लीतील एफएसएल कार्यालयाबाहेर हा हल्ला झाला आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. आफताबला पोलिसांच्या गाडीमध्ये बसवून जेलमध्ये नेण्यात येत होते त्यावेळी हा प्रकार घडला. दरम्यान हल्ला केलेले कार्यकर्ते हे हिंदू सेनेचे असल्याचा दावा केला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा