Tuesday, July 1, 2025

London University : कृत्रिम डोळा तयार करण्यात यश

लंडन (वृत्तसंस्था) : संशोधनामध्ये दिवसेंदिवस प्रगती होत असून कृत्रिम डोळा तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. (London University) लंडन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या कृत्रिम डोळ्याचा शोध लावला आहे.


हा कृत्रिम डोळा मानवी नैसर्गिक डोळ्याप्रमाणे काम करेल. थ्रीडी मिनी आयला रेटिनल ऑर्गेनॉयड्स असे म्हटले गेले आहे. हा कृत्रिम डोळा बनवण्यासाठी मानवी त्वचेचा वापर करण्यात आला आहे. लंडन विद्यापिठातील शास्त्रज्ञांनी या कृत्रिम डोळ्याचा शोध लावला आहे. या मिनी थ्रीडी डोळ्यामध्ये डोळ्याची बाहुली आणि रेटिना देखील आढळते.


शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी कृत्रिम डोळा तयार करण्यासाठी प्राण्यांच्या पेशींवर संशोधन केले गेले होते, पण याचे चांगले परिणाम मिळाले नाहीत. आता मानवी त्वचेपासून तयार करण्यात आलेल्या मिनी आयमधून अनेक गोष्टी शोधल्या जाऊ शकतात.


एखाद्या व्यक्तीची पाहण्याची क्षमता कशी जाते, हे शोधण्याचा शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. याशिवाय डोळ्यांशी संबंधित अनुवंशिक आजारांसंदर्भात संशोधन सुरू आहे. यामुळे भविष्यात डोळ्यांसंबंधिच्या आजारांवरील उपचारात मदत होऊ शकेल. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मिनी आयवरील संशोधनामुळे वयाच्या पन्नाशीनंतर होणाऱ्या मॅक्युलर डिजेनेरेशनवर उपाय शोधण्यात मदत होईल. मॅक्युलर डिजेनेरेशन आजारामध्ये डोळ्यांची दृष्टी कालांतराने कमी होऊ लागते.

Comments
Add Comment