Saturday, July 20, 2024
Homeमहत्वाची बातमीLavani artiste : लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन : तीन...

Lavani artiste : लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन : तीन जण जखमी

सोलापूर : ज्येष्ठ लावणी कलावंत (Lavani artiste) मीना देशमुख यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. पंढरपूरकडे निघालेली एक फॉर्च्युनर गाडी कालव्यात पडल्याने झालेल्या अपघातामध्ये लावणी कलावंत मीना देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य तीन जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना पंढरपूर तालुक्यात घडली आहे.

ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख रविवारी रात्री आपल्या फॉर्च्युनर कारने मोडलिंबकडून पंढरपूरकडे येत होत्या. गाडीत मीना देशमुख यांच्यासह त्यांची मुलगी, नात आणि ड्रायव्हर होते. रात्रीच्या वेळी तालुक्यातील आष्टी व रोपळे गावच्या दरम्यान अरुंद पुलावरून गाडी जात असताना ड्रायव्हरचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडी ५० फूट खोल कालव्यात पडली.

कालवा इतका खोल होता की त्यात उतवण्यासाठी पूरेशी जागा नव्हती. तसेच रात्रीच्या वेळी अपघात झाल्याने माहिती उशिरा मिळाली. अपघाताची माहिती मिळताच बाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्याला सुरूवात केली. अँम्ब्युलन्स बोलावून गावकऱ्यांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात पाठवले. मात्र मीना देशमुख यांचा जागीत मृत्यू झाला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -