Friday, July 11, 2025

FIFA World Cup : मोरक्कोकडून पराभवानंतर बेल्जियममध्ये तोडफोड

FIFA World Cup : मोरक्कोकडून पराभवानंतर बेल्जियममध्ये तोडफोड

ब्रसेल्स (वृत्तसंस्था) : फिफा विश्वचषक स्पर्धेत (FIFA World Cup) दुबळ्या मोरक्कोकडून झालेला पराभव बेल्जियमच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.


या उलटफेरमुळे बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये अनेक ठिकाणी अनेक लोकांनी रस्त्यावर उतरून वाहनांची तोडफोड केली. अनेक गाड्या पेटवल्या. या हिंसाचारात कोणतीही जीवीतहानी झाल्याची माहिती उशीरापर्यंत समोर आली नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, बेल्जियमचा पराभव झाल्यानंतर त्यांचे चाहते संतप्त झाले. त्यांनी ब्रसेल्समध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार केला. पराभव झाल्यामुळे संतापलेल्या लोकांना इलेक्ट्रिक कारसह अनेक स्कूटर्स, गाड्या यांना आग लावली. या घटनेनंतर ब्रसेल्स पोलिसांनी या हिंसाचार प्रकरणात अनेकांना ताब्यात घेतले आहे.

Comments
Add Comment