Saturday, July 13, 2024
Homeमहत्वाची बातमीEmployee reductions : कंपनीतून रातोरात पाठवला न येण्याचा मेसेज ; २७०० कर्मचारी...

Employee reductions : कंपनीतून रातोरात पाठवला न येण्याचा मेसेज ; २७०० कर्मचारी कपात

मिसिसिपी (वृत्तसंस्था) : जगभरात कंपनीतील कर्मचारी कपात काही थांबायचे नाव घेत नाही. (Employee reductions) अमेरिकेतील एका कंपनीने जवळपास २,७०० कर्मचाऱ्यांना रातोरात नारळ दिला. मिसिसिपी येथील फर्निचर बनवणारी ही कंपनी आहे.

अमेरिकेतील एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तपत्रानुसार, युनायटेड फर्निचर इंडस्ट्रीज (यूएफआय) ने २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्री कर्मचाऱ्यांना मेसेज पाठवला आणि ईमेल केला आणि त्यांना दुसऱ्या दिवशी कामावर न येण्यास सांगितले. यूएफआय ही बजेट फ्रेंडली ही कंपनी सोफे आणि रिक्लायनर्स बनवण्यासाठी ओळखली जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की, संचालक मंडळाच्या निर्देशानुसार… आम्हाला कळविण्यात खेद वाटतो की, अचानक व्यवसायाची परिस्थिती आमच्या नियंत्रणाबाहेर निर्माण झाली आहे. यामुळे कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला आहे. दुसऱ्या ईमेलमध्ये असे म्हटले आहे की, तुम्हाला कायमचे काढून टाकले जात आहे आणि तुमच्या सर्व सुविधा बंद करण्यात आल्या आहेत.

कंपनीने आपल्या चालकांना इक्विपमेंट, इव्हेंट्री आणि डिलिव्हरी डॉक्युमेंट्स त्वरित प्रभावाने परत करण्याचे निर्देश दिले. त्यांना अचानक का काढण्यात आले, याबाबत कर्मचाऱ्यांना कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. दोन दशके जुन्या या कंपनीने अचानक काम बंद केले आहे.

उन्हाळ्यात कंपनीने आपले चीफ एक्झिक्यूटिव्ह, चीफ फायनान्शियल ऑफिसर आणि सेल्सचे एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट यांना काढून टाकले होते, अशी माहिती अमेरिकेतील एका इंग्रजी दैनिकाने दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -