Sunday, July 21, 2024
Homeमहत्वाची बातमीAsian tiger mosquito species : डास चावल्याने तरुणावर ३० शस्त्रक्रिया

Asian tiger mosquito species : डास चावल्याने तरुणावर ३० शस्त्रक्रिया

जर्मनीतील प्रकार

बर्लिन (वृत्तसंस्था) : डास (Asian tiger mosquito species) चावल्याने एका तरुणाची बिकट अवस्था झाली होती. त्याच्यावर जवळपास ३० शस्त्रक्रिया झाल्या आहेत. जर्मनीतील हा प्रकार आहे. सुदैवाने हा तरुण यातून बरा झाला आहे.

जर्मनीत वास्तव्यास असलेल्या सेबेशियन रॉट्सचक यांना एशियन टायगर प्रजातीचा डास चावला. यामुळे रॉट्सचक मृत्यूच्या दाढेत पोहोचले. २७ वर्षांच्या रॉट्सचक यांची अवस्था बिकट झाली. डास चावल्यानंतर त्यांच्या रक्तात विष पसरले. यानंतर रॉट्सचक यांच्या यकृत, किडनी, हृदय आणि फुफ्फुसाने काम करणे बंद केले. संसर्ग झाल्याने त्यांच्या अनेक अवयावांवर परिणाम झाला.

२०२१ मध्ये रॉट्सचक यांना डास चावला. त्यामुळे त्यांना डाव्या मांडीवरील त्वचेचे प्रत्यारोपण करावे लागले. सुरुवातीला फ्लू सारखी लक्षणे जाणवली आणि ते आजारी पडले. त्यांना जेवायला जमत नव्हते. अंथरुणात उठून बसता येत नव्हते. रॉट्सचक यांची अवस्था दिवसागणिक खालावत होती.

डाव्या मांडीवर डासाने हल्ला केला. या जीवाणूने रॉट्सचक याची जवळपास निम्मी मांडी खाल्ली. ही सगळी लक्षणे एशियन टायगर डास चावला असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. रॉट्सचक याच्यावर एकूण ३० शस्त्रक्रिया झाल्या. त्याच्या पायाची दोन बोटे कापावी लागली. चार आठवडे ते कोमात होते. आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. सुदैवाने यातून तो बरा झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -