Saturday, August 30, 2025

ashram school : नाशिकमध्ये संस्थाचालकाकडून आश्रम शाळेत शिकणाऱ्या सहा मुलींवर अत्याचार

नाशिक : म्हसरुळ शिवारातील द किंग फाउंडेशन संस्थेच्या ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमात (ashram school) संस्थाचालक हर्षल मोरे याने सहा मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. आश्रमातून काढून टाकण्याची धमकी दिल्यामुळे पीडितांपैकी कोणीही तक्रार केली नाही.

म्हसरूळ शिवारातील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात चौदा वर्षांच्या मुलीवर संशयित संस्थाचालक हर्षल मोरे याने बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी गांभीर्याने तपासाला सुरुवात करीत अन्य मुलींचेही जबाब नोंदविले. यात चार अल्पवयीन तर एक सज्ञान मुलीकडून असे वेगवेगळे पाच गुन्हे दाखल नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तर यातील एक गुन्हा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल होत आहे.

यात अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले, असून मोरे याने मुलींना हातपाय दाबायला बोलवून हे प्रकार करत असल्याचे आढळले आहे. हर्षल मोरे याने मुलींना आश्रमातून काढून टाकण्याची धमकी देत आणखी काही मुलींवर अत्याचार केल्याची पुढे आले आहे. नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीवर मोरे याने बलात्कार केल्याची घटना घडल्यानंतर तिने जवळच्या नातेवाइकांकडे याबाबत माहिती दिली होती.

ICMR : सौम्य ताप असल्यास अँटिबायोटिक औषधांचा वापर टाळा

आधार आश्रमातील मुली एकमेकांना विचारणा करायच्या मात्र आश्रमातून काढून टाकण्याची धमकी दिल्यामुळे पीडितांपैकी कोणीही तक्रार करण्यासाठी पुढे येत नव्हत्या. तसेच मुलींवर गेल्या अनेक वर्षांपासून अत्याचार होत असल्याची बाब पुढे आली आहे. आधार आश्रमातील सर्व मुलींची चौकशी केली असता काही मुलींबरोबर गैरकृत्य झाल्याचे समोर आले आहे. सखोल तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यानी सांगितले आहे.

Comments
Add Comment