
गुवाहटी : आसामध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी तात्काळ मंजुरी. त्यामुळे कामाख्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या मराठी जनतेची सोय होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे वक्तव्य. तर नवी मुंबईत आसाम भवनसाठी जागा देणार असल्याची माहिती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी रेडिसन ब्लु हॉटेलमध्ये आज सदिच्छा भेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्र आणि आसाम राज्यामध्ये परस्पर संबंध अधिक दृढ व्हावेत तसेच या दोन राज्यात उद्योग, व्यापार, पर्यटनात वाढ व्हावी यासाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदंनी ही मागणी मान्य केली आहे.
शिंदे गटाचा दोन दिवसांचा गुवाहटी दौरा आज आटोपला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. खोक्यांच्या मुद्द्यावरुनही शिंदेंनी ठाकरेंना थेट आव्हान दिले. आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहटीमध्ये जात कामाख्या देवीचे दर्शन घेतले. शिवाय आसामच्या मुख्यमंत्र्यांचा पाहुणचार घेतला. यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, कामाख्या देवीचे मनोभावे दर्शन घेतले. सगळ्यांना समाधान आणि आनंद वाटला. काल आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आमचे जंगी स्वागत केले. त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारीही सोबत होते. जिथे आम्ही थांबलो तिथे मुख्यमंत्रीही आले होते. त्यांनी स्नेहभोजन दिल्याचे शिंदेंनी सांगितले.
Narayan Rane : भाजप नेत्यांवर टीका सहन करणार नाही
तुमचे कंटेनरमधले खोके काढू का?
खोक्यांच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंना उत्तर देतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, आमदारांच्या छोट्या-मोठ्या खोक्यांबद्दल काय बोलता? फ्रिजमधून खोके कुठे गेले, कंटेनरमधले खोके कुणाकडे जाऊ शकतात, हे समोर येईल. काल केसरकर यांनी सूचक विधान केलेले आहेच. आता सगळ्या दुनियेला माहिती होईल, असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंना दिला.