Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

Kris Wu : घरी बोलवून २५ मुलींवर बलात्कार करणा-या गायकाला १३ वर्षांची शिक्षा

Kris Wu : घरी बोलवून २५ मुलींवर बलात्कार करणा-या गायकाला १३ वर्षांची शिक्षा

बीजिंग : बीजिंगच्या एका न्यायालयाने चीनी-कॅनडियन पॉप गायक क्रिस वू (Kris Wu) याला १३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लैंगिक गुन्ह्यात वू दोषी आढळल्यानंतर न्यायालयाने त्याला ही शिक्षा सुनावली. ३२ वर्षीय क्रिस वू याला तब्बल २५ अल्पवयीन मुलींसह तीन महिलांवर बलात्कार आणि सामूहिक लैंगिक कृत्यांसाठी गर्दी जमवल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले.

गेल्या वर्षी क्रिस वू याला पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी एका विद्यार्थिनीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला. यानंतर आणखी २४ मुली पुढे आल्या आणि त्यांनी वूविरोधात साक्ष दिली. वूला हद्दपार केले जाईल, असे कोर्टाचे म्हणणे आहे. मात्र, चीनमध्ये लोकांना त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर हद्दपार करण्याची प्रक्रिया केली जाते.

ख्रिस वूवर प्रथम डू मीझू नावाच्या विद्यार्थिनीने आरोप केले होते. या मुलीने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे सांगितले होते की, ती दोन वर्षांपूर्वी वूला भेटली होती. तेव्हा मुलीचे वय १७ वर्ष होते. मुलीच्या म्हणण्यानुसार, तिला गायकाच्या घरी आयोजित पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. इथे तिला जबरदस्तीने दारू पाजण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली तेव्हा ती क्रिस वू च्या बेडवर होती.

ख्रिस वूने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. मात्र त्यानंतर आणखी २४ मुली पुढे आल्या आणि त्यांनी त्याच्यावर आरोप केले. ख्रिस वूने त्यांना पार्ट्यांमध्ये कसे आमंत्रित केले आणि त्यानंतर दारू पाजण्यात आल्यावर काय घडले ते त्यांनी सांगितले. यासोबतच ख्रिस वूवर कर फसवणुकीचाही आरोप आहे.

Comments
Add Comment