Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

FIFA World Cup : यूएसएने इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखले

FIFA World Cup : यूएसएने इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखले

दोहा (वृत्तसंस्था) : फिफा विश्वचषक स्पर्धेतील (FIFA World Cup) बी गटातील शनिवारी झालेल्या सामन्यात यूएसएने इंग्लंडला ०-० असे गोलशून्य बरोबरीत रोखले. दोन्ही संघांना गोल करण्याच्या संधी मिळाल्या. पण त्या ते यशस्वी होऊ शकले नाहीत.

इंग्लंडकडे ८, तर यूएसएकडे १० गोल करण्याच्या संधी होत्या. इंग्लंडने ३ वेळा चेंडू गोलपोस्टच्या दिशेने मारला. पण यूएसएच्या गोलकिपरने अप्रतिम कामगिरी करत इंग्लडला गोल करण्यापासून रोखले. यूएसएने १० पैकी एक शॉट गोलपोस्टवर तडकावला. पण त्यांनाही गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे हा सामना ०-० असा गोलशून्य बरोबरीत अनिर्णित राहिला. इंग्लंडने एकूण सामन्याच्या ५६ टक्के चेंडू आपल्या ताब्यात ठेवला, तर यूएसएने ४४ टक्के चेंडू आपल्या ताब्यात ठेवला.

दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच बचावात्मक खेळ खेळला. गोल करण्यापेक्षा वाचवण्यावर अधिक भर दिला. तशा दोन्ही संघांना गोल करण्याच्या मोजक्या संधी मिळाल्या. त्यातही एखाद-दुसराच चेंडू गोलपोस्टवर मारला. त्यामुळे दोन्ही संघ गोल करण्यापासून दूर राहिले.

दरम्यान बी गटात चार गुणांसह इंग्लंडचा संघ अव्वल स्थानी आहे. ३ गुणांसह इराणचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. दोन गुणांसह यूएसएचा संघ तिसऱ्या स्थानी आहे, तर वेल्सचा संघ १ गुण मिळवत तळात आहे. चारही संघांचे प्रत्येकी २ सामने झाले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >