Sunday, July 21, 2024
Homeक्रीडाCharlotte Russell : फिफा वर्ल्डकपमधील खेळाडूच्या गर्लफ्रेंडचे फोटो सोशल मीडियावर वायरल!

Charlotte Russell : फिफा वर्ल्डकपमधील खेळाडूच्या गर्लफ्रेंडचे फोटो सोशल मीडियावर वायरल!

कतार : ब्रिटीश मॉडेल शार्लोट रसेल (Charlotte Russell) सोशल मीडिया सेन्सेशन आहे आणि सतत पोस्ट शेअर करत असते. शार्लोट रसेल ही वेल्स संघाचा स्टार स्ट्रायकर किफर मूरे (Kieffer Moore) याची गर्लफ्रेंड आहे. ३० वर्षीय किफर मूरेने अद्याप लग्न केलेले नाही.

कतारमध्ये आयोजित फिफा विश्वचषक २०२२च्या हंगामातील वेल्स संघाचा स्टार स्ट्रायकर किफर मूरे याने वेल्स संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. मात्र किफरची जादू फिफाच्या या हंगामात आतापर्यंत काम करू शकली नाही.

स्टार फुटबॉलपटू किफर मूरेला सेलिब्रेट करण्यासाठी शार्लोट रसेल सुद्धा कतारला पोहोचली आहे. या फिफा विश्वचषकापूर्वी दोघांनी एकत्र वेळ घालवला होता आणि किफर आणि शार्लोट एका हॅलोविन पार्टीतही दिसले होते.

किफर मूरेसोबत गर्लफ्रेंड शार्लोट ही फिफीच्या सामन्यांमध्ये किफरला चिअर्स करताना दिसत आहे. याआधी शार्लोटने युरो २०२० मध्ये सुद्धा किफर मूरेला सपोर्ट केला होता.

किफरची गर्लफ्रेंड शार्लोटने गेल्या महिन्यातच बीचवर अनेक फोटोशूट केले होते. हे फोटोही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. यासोबतच शार्लोटने फिफा विश्वचषकासाठी येथे आल्याबद्दल आपल्या संघाचे आभारही मानले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -