Tuesday, July 16, 2024
Homeक्रीडाFIFA World Cup : ऑस्ट्रेलियाची विजयी सुरुवात

FIFA World Cup : ऑस्ट्रेलियाची विजयी सुरुवात

फिफा वर्ल्डकप २०२२; ट्युनिशियावर १-० असा विजय

दोहा (वृत्तसंस्था) : डी गटात ऑस्ट्रेलियाने ट्युनिशियावर १-० असा विजय मिळवत फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या (FIFA World Cup) मोहिमेची विजयी सुरुवात केली. शनिवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल ड्युकने पहिल्याच हाफमध्ये २३व्या मिनिटाला गोल केला.

विशेष म्हणजे या विजयाबरोबर ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपमध्ये तीन वेगवेगळ्या खंडातील संघांना पराभूत करणारी तिसरी टीम ठरली आहे. त्यांनी आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडातील संघांचा वेगवेगळ्या वर्ल्डकपमध्ये पराभव केला. यापूर्वी अशी कामगिरी इराण आणि अल्जेरियाने केली होती. याचबरोबर ऑस्ट्रेलियाने १९७४ नंतर पहिल्यांदाच वर्ल्डकप सामन्यात गोल खाल्ला नाही. पहिल्या हाफमध्ये ऑस्ट्रेलिया आणि ट्युनिशिया यांच्यात बॉलवर ताबा मिळवण्यासाठी चुरस पहायला मिळाली.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या ड्युकने २३व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल केला आणि संघाचे गोलचे खाते उघडले. पहिल्याच हाफच्या सुरूवातीलाच ट्युनिशियाने गोल खाल्याने त्यांनी या गोलची परतफेड करण्यासाठी जोरदार खेळ करण्यास सुरूवात केली. ट्युनिशियाने ऑस्ट्रेलियाच्या गोलपोस्टवर चढाई करण्यास सुरुवात केली. मात्र ऑस्ट्रेलियाच्या बचाव फळीने आपल्या गोलपोस्टचा चांगला बचाव केला.

यानंतर दुसऱ्या हाफमध्ये देखील ट्युनिशियाने पासिंग आणि बॉल पजेशनच्या बाबतीत ऑस्ट्रेलियापेक्षा सरस खेळ केला. याचबरोबर ट्युनिशियाने सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलपोस्टवर १४ वेळा हल्ला चढवला. मात्र त्यातील ४ शॉट्सच अचूक होते. याउलट ऑस्ट्रेलियाने ९ शॉट्सपैकी २ शॉट्सच अचूक मारले. त्यातील एक गोलमध्ये रुपांतरित झाला. पहिल्याच हाफमध्ये गोल झाल्यानंतर ट्युनिशियाने गोलची परतफेड करण्यासाठी आक्रमक खेळ केला. पण त्यांना गोल काही करता आला नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -