Saturday, July 13, 2024
Homeकोकणरत्नागिरीChandrashekhar Bavankule : लांजा तालुक्यात भाजपा शतप्रतिशत करा - बावनकुळे

Chandrashekhar Bavankule : लांजा तालुक्यात भाजपा शतप्रतिशत करा – बावनकुळे

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी साधला लांजा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद, आगामी काळात तालुक्यासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचे दिले आश्वासन

लांजा (प्रतिनिधी) : आगामी काळात संपूर्ण लांजा तालुका हा भाजपामय झाला पाहिजे. यासाठी लागेल तो निधी पक्षाच्या माध्यमातून दिला जाईल, असे ठोस आश्वासन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी लांजा येथे दिले.

रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शुक्रवारी सायंकाळी लांजा येथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शहरातील संकल्प सिद्धी सभागृहात पार पडलेल्या या भाजपा मेळाव्याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नेत्या चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन तसेच अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, शैलेंद्र दळवी, तालुकाप्रमुख महेश खामकर आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्री.बावनकुळे यांनी सांगितले की, आगामी काळात संपूर्ण लांजा तालुका हा शतप्रतिशत भाजपामय झाला पाहिजे. यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या लोक कल्याणकारी योजना या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा. या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत करा. यासाठी तालुक्याच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी पक्षाच्या माध्यमातून दिला जाईल, असे ठोस आश्वासन त्यांनी येथील पदाधिकाऱ्यांना दिले.

सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे लांजा तालुकाध्यक्ष महेश खामकर व पदाधिकारी यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपाचे शहराध्यक्ष प्रमोद कुरूप, तालुका प्रभारी वसंत घडशी, नगरसेवक संजय यादव, मंगेश लांजेकर, जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे तसेच हेमंत शेट्ये, ओबीसी सेलचे दादा भिडे, अशोक गुरव, बाबा राणे, विशू जेधे, रवींद्र कांबळे, तालुका सरचिटणीस विराज हरमले आदींसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -