आमरस

सकाळी सकाळी व्हाॅट्सअॅपवर ढीगभर मेसेज "हॅपी मेन्स डे" आणि एक प्रसंग आठवला. आंब्याचे दिवस. रविवार दुपार, आमरसाचा बेत. आता, आमरसाचा बेत म्हणजे फक्त आणि फक्त आमरस पुरी. नंतर अगदीच वाटलं तर आमटी भात. चौथा पदार्थ नाही. मनसोक्त आमरस ओरपणे हा एकमेव कार्यक्रम. सकाळपासून तयारी. आमरसाच्या वाट्या भरल्या. साधारण ५ वी, ६ वी संपली असेल. आमरसाचा टोप संपत आलेला. उरलेला संपवता संपवता बायकोने २ शेवटच्या वाट्या भरल्या. एक थोडीशी जास्त, एक कमी.


जास्त भरलेली वाटी लेकाच्या ताटात गेली. दुसरी माझ्याकडे. मी त्या वाट्यांकडे बघतोय हे बायकोने बघितलं, एकच वाक्य (जरा करड्या आवाजात )..." माझं कोकरू आहे न ते" (१७ वर्षांच !!!!) दुसरा प्रसंग. मी साधारण दहा-बारा वर्षांचा. असाच आमरसाचा प्रोग्राम. आमरसाचा टोप संपत आलेला. उरलेला संपवता संपवता आईने २ शेवटच्या वाट्या भरल्या. एक थोडीशी जास्त, एक कमी. जास्त भरलेली वाटी माझ्या ताटात. दुसरी बाबांकडे. बाबा त्या वाट्यांकडे बघताहेत हे आईने बघितलं, एकच वाक्य (खरे तर काहीच शब्द नाहीत)...


असो... कालचक्र बदललं, जग, संपत्तिक स्थिती, एक अख्खी पिढी... अगदी, सगळं सगळं बदललं. आईच्या जागी बायको आली, बाबांच्या जागी मी आलो... नाही बदलली फक्त, पुरुषाच्या आयुष्यात येणारी तृप्ततेची ढेकर, थोड्या कमी आमरसाच्या वाटीने येणारी.


-डॉ. मिलिंद घारपुरे

Comments
Add Comment

पाकव्याप्त काश्मीरमधील होरपळ

पाकव्याप्त काश्मीरमध्ये निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये अलीकडेच झालेल्या हिंसक चकमकीत तीन पोलीस अधिकाऱ्यांसह

याला जबाबदार कोण?

सध्याच्या परिस्थितीत बेस्ट उपक्रम हा व्हेंटिलेटरवर आहे. या बेस्ट उपक्रमात कार्यरत आणि सेवानिवृत्त मराठी सेवक

नोबेलचाही राहिला सन्मान

नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वप्न ‘चकनाचूर’ झाले. नोबेल

हुमनॉइड व्योममित्र: एक क्रांतिकारी पाऊल

भारताने मानव उड्डाणक्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्धार केला असून त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ‘व्योममित्र’

शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक समुपदेशन महत्त्वाचे

आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनात, आपण अनेकदा आपल्या शारीरिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देतो. नियमित

भारताची मोदीप्रणीत हनुमान उडी

संपूर्ण भारतात दीपावलीचे दिवे प्रज्वलीत केले जात असताना, वर्तमानाशी सुसंगत रामायणातील एक कालातीत दृश्य आपल्या