Tuesday, May 6, 2025

क्रीडा

FIFA World Cup : इराणचे जोरदार पुनरागमन

FIFA World Cup : इराणचे जोरदार पुनरागमन

दोहा (वृत्तसंस्था) : फिफा विश्वचषक स्पर्धेची (FIFA World Cup) लाजिरवाणी सुरुवात करणाऱ्या इराणने दुसऱ्याच सामन्यात वेल्सविरुद्ध २-० ने विजय मिळवत जोरदार पुनरागमन केले. इंज्युरी टाईमच्या शेवटच्या तीन मिनिटांत इराणने दोन गोल करत विजय मिळवला.


ग्रुप बी मधील पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून अर्धा डझन गोल खाल्लेल्या इराणने दुसऱ्याच सामन्यात जोरदार पुनरागमन करत वेल्स विरूद्ध इंज्यूरी टाईमच्या शेवटच्या तीन मिनिटात दोन गोल करत विजय मिळवला. दोन्ही हाफमध्ये इराणने वेल्सवच्या गोलपोस्टवर सातत्याने चढाया केल्या होत्या. मात्र त्यांना गोल करण्याची संधी मिळाली नाही.


मात्र शेवटच्या मिनिटापर्यंत इराणने जिद्द सोडली नाही. अखेर रोझबेन चेश्मामीने ११ मिनिटाच्या इंज्युर टाईममध्ये ८व्या मिनिटाला वेल्सवर पहिला गोल डागला. त्यानंतर अवघ्या ३ मिनिटांत ११व्या मिनिटाला रामिन रिझाईनने दुसरा गोल करत इराणचा पहिला वहिला विजय निश्चित केला.



kho-kho tournament : महाराष्ट्राच्या महिला संघाचे विजेतेपद कायम


इराणने वेल्सच्या गोलपोस्टवर सातत्याने चढाया केल्या. त्यांनी सामन्यात तब्बल २१ चढाया केल्या. त्यातील सहा ऑन टार्गेट होत्या. तर दुसरीकडे वेल्सने १० वेळा इराणच्या गोलपोस्टवर चाल केली. मात्र त्यातील ३ वेळाच त्यांचे शॉट्स ऑन टार्गेट होते. वेल्स बॉलवर ताबा मिळवण्यात आणि पासेसच्या बाबतीत इराणपेक्षा सरस असली तरी इराणच्या आक्रमकतेपुढे ते हतबल ठरले.

Comments
Add Comment