Saturday, May 10, 2025

देशमहत्वाची बातमी

De-addiction center : नशामुक्ती केंद्रातून परतलेल्या मुलाने केली संपूर्ण कुटुंबाची हत्या

नवी दिल्ली : नशामुक्ती केंद्रातून (De-addiction center) परतलेल्या तरुणाने संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याची घटना नवी दिल्लीत घडली. काही महिन्यांपासून नशामुक्ती केंद्रात असलेला २५ वर्षांचा केशव घरी परतला. काही कारणावरून त्याचा कुटुंबीयांशी वाद झाला. यानंतर केशवने आई, वडील, लहान बहिण आणि आजीची चाकूने भोसकून हत्या केली.


हत्याकांडाची माहिती मिळताच पोलीस रात्री साडे दहा वाजता घटनास्थळी पोहोचले. आरोपीने तिथून पळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला पकडण्यात यश आले. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली. आईने प्रेमापोटी केशवला घरी परत आणले होते. मात्र त्याची अमली पदार्थांची सवय काही सुटली नव्हती. त्यामुळे कुटुंबिय केशवशी वाद घालायचे. हत्येवेळी केशव नशेच्या अमलाखाली होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Comments
Add Comment