पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांच्या तब्येतीविषयीचे अपडेट त्यांचे जवळचे मित्र राजेश दामले यांनी पत्रकार परिषद घेत दिली. त्यांनी अशी माहिती दिली की, विक्रम गोखलेंची प्रकृती चिंताजनक आहे, पण अफवांवर विश्वास ठेवू नका. दामलेंच्या माहितीनुसार विक्रम गोखले यांचे अनेक अवयव निकामी झाले आहेत. डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांचे शरीर म्हणावा तसा प्रतिसाद देत नाही. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
‘कालपासून त्यांची (Vikram Gokhale) प्रकृती चिंताजनक आहे. खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. पण डॉक्टरांचे सध्या प्रयत्न सुरु आहेत. जसे पुढचे अपडेट्स येतील तसे सर्वांना कळवले जाईल.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत डॉक्टर माहिती देत नाहीत तोपर्यंत पुढे काही सांगू शकत नाही. कोणी जर अफवा पसरवत असेल तर त्यांना थांबवा, असे आवाहनही त्यांनी केले.
विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले आणि त्यांच्या मुलीनेही विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबात माहिती दिली. त्यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार विक्रम गोखले यांना ५ नोव्हेंबर रोजी या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांनी सांगितले की, ‘विक्रम गोखले यांची प्रकृती कालपासून गंभीर असून ते लाइफ सपोर्टवर आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहा.’ त्या म्हणाल्या, ‘ते काल कोमामध्ये गेले होते. त्यानंतर त्यांनी काहीही रिस्पॉन्स दिलेला नाही.’
विक्रम गोखले यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची खूप मोठी पसंती मिळाली. विक्रम गोखले यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…