Saturday, September 13, 2025

Pratap Sarnaik : प्रताप सरनाईकांकडून तब्बल ७५ तोळे सोने तुळजाभवानीला अर्पण

Pratap Sarnaik : प्रताप सरनाईकांकडून तब्बल ७५ तोळे सोने तुळजाभवानीला अर्पण

ठाणे : शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी तुळजाभवानी देवीला ७५ तोळे सोने अर्पण केले आहे. प्रताप सरनाईक आपल्या कुटुंबीयांसोबत तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी तब्बल ३७ लाख ५० हजार किंमतीचे ७५ तोळे सोन्याचे दागिने देवीच्या चरणी अर्पण केले. आपण केलेला नवस पूर्ण झाल्याने दागिने अर्पण केल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

“तुळजाभवानी आमचे कुलदैवत आहे. माझ्या दोन्ही मुलांच्या लग्नावेळी नवस केला होता. तसेच दोन्ही नातवंडांचे जायवळ करायचे होते. नवस फेडण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. नवस केला होता तेव्हा ५१ तोळ्यांच्या पादुका आणि २१ तोळ्याचा हार देईन असे म्हटले होते. मध्यंतरी कोरोना काळ आणि काही संकटांमुळे येता आले नव्हते. प्रसिद्धी किंवा प्रसारमाध्यमांसाठी हे काही केलेले नाही. वर्षातून एकदा मी दर्शनासाठी येत असतो,” असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Pratap Sarnaik

देवीकडे मांडलेले गाऱ्हाणे पूर्ण झाल्यानेच पत्नी, दोन्ही मुलं, सूना आणि नातू यांना घेऊन आलो असल्याचे त्यांनी सांगितलो. “मी पहिल्या मुलाच्या लग्नावेळी ५१ तोळ्याचा आणि दुसऱ्या मुलाच्या लग्नावेळी २१ तोळ्याचा हार घालेन असे म्हटले होते. पत्नीनेच साकडे घातले असल्याने तिने सोनाराकडून दागिने बनवून घेतले होते. दोन वर्षांपासून ते दागिने आमच्याकडे होते. कोरोनामुळे मंदिरं बंद होती, तसेच इतर संकटं आमच्यावर होती. त्यामुळे येऊ शकलो नव्हतो. पण आता वेळ मिळाल्याने आम्ही आलो,” अशी माहिती प्रताप सरनाईकांनी दिली.

हे सुद्धा वाचा - प्रकल्प नेला म्हणून बोंबलायचे अन् येणाऱ्याला विरोध करायचा

Comments
Add Comment