Saturday, June 21, 2025

shooting incident : गोळीबाराच्या घटनेने अमेरिका हादरली

shooting incident : गोळीबाराच्या घटनेने अमेरिका हादरली

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) : गोळीबाराच्या घटनेने (shooting incident) अमेरिका हादरली आहे. अमेरिकेत व्हर्जिनियातील चेसापीक येथील वॉलमार्ट स्टोअरमध्ये मंगळवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. यात १० जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. तसेच अनेक लोक जखमी झाले आहेत.


चेसापीक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबाराच्या घटनेत सुमारे १० लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या घटनेत बरेच लोक जखमी झाले आहेत. पोलीस या संपूर्ण घटनेची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला ठार केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.


पोलीस या घटनेची चौकशी करत असून तपास सुरू आहे. पोलिसांनी गोळीबार झालेल्या ठिकाणाहून लोकांची गर्दी हटवली आहे. तसेच, या घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री १० वाजून १२ मिनिटांनी गोळीबार झाल्याची माहिती देणारा फोन पोलिसांना आला होता.


अमेरिकेतील एका डॉट कॉमवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, घटनास्थळी उपस्थित लोकांनी गोळीबार करणारा व्यक्ती स्टोअरचा मॅनेजर असल्याचे सांगितले आहे. मॅनेजर ब्रेक रुममध्ये घुसला आणि दुकानातील इतर कर्मचाऱ्यांवर बेशूट गोळीबार केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा