Thursday, October 30, 2025
Happy Diwali

Citizen Honor Award : दत्ताराम साटम यांना उत्कृष्ट नागरिक सन्मान पुरस्कार

Citizen Honor Award : दत्ताराम साटम यांना उत्कृष्ट नागरिक सन्मान पुरस्कार

वैभववाडी (वार्ताहर) : करूळ येथील सेवानिवृत्त शिक्षक दत्ताराम साटम यांना भारतीय उत्कृष्ट नागरिक सन्मान पुरस्कार (Citizen Honor Award) मिळाल्याबद्दल आमदार नितेश राणे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

साटम यांना जुलै २०२२ मध्ये राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांना हा दुसरा पुरस्कार मिळाला आहे. टीजीएचआरएफ दिल्ली यांच्याकडून हा पुरस्कार देण्यात आला आहे.

वैभववाडी येथील दौऱ्यात नितेश राणे यांनी साटम यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी वैभववाडी भाजप अध्यक्ष नासिर काझी, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, अरविंद रावराणे, बाळा कदम, प्रकाश सावंत, यशवंत कोलते, बाळा मोरे व कार्यकर्ते उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त दत्ताराम साटम यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा