Friday, May 9, 2025

महाराष्ट्र

leopard : दीड तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्याला केले जेरबंद

leopard : दीड तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्याला केले जेरबंद

नाशिक (प्रतिनिधी) : जवळपास दीड तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर वनविभागास शहरातील द्वारका परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास बंगल्यात घुसलेल्या बिबट्याला (leopard) जेरबंद करण्यात यश आले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री द्वारका परिसरातील आयेशानगर भागातील रहिवासी एजाज काझी यांच्या बंगल्यात बिबट्या शिरल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरीत याबाबतची माहिती वनविभागाला कळवली. बंगल्यात बिबट्या असल्याचे समजताच परिसरातील नागरिक भयभित झाले होते.


वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यावर नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे वनविभागाच्या पथकास रेस्क्यु ऑपरेशन करण्यात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे मुंबई नाका पोलिसांची कुमक मागविण्यात आली. यावेळी लोकांना हटविण्यात आले. वनविभागाच्या पथकाने बिबट्याला जेरबंद केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.


घटनास्थळी वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपरिमंडल अधिकारी अनिल अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यु ऑपरेशन सुरु होते. सुरुवातीला बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. पहिल्या इंजेक्शनमध्ये बिबट्या काही अंशी बेशुद्ध झाला होता. अखेर दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आले.

Comments
Add Comment