Sunday, July 14, 2024
HomeदेशMumbai Police : पंतप्रधानांच्या हत्येचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा कट; मुंबई पोलिसांना...

Mumbai Police : पंतप्रधानांच्या हत्येचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा कट; मुंबई पोलिसांना मॅसेज आल्याने खळबळ

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने कट रचल्याचा व्हॉटसअप मॅसेज मुंबई पोलिसांना (Mumbai Police) आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मोदींना यापूर्वीही ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.

एकीकडे भारत जोडो यात्रा करणाऱ्या राहुल गांधी यांना धमकी देण्यात आल्याची बातमी नुकतीच आली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदीही टार्गेटवर असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरू केला आहे.

मुंबई पोलिसांना पाठलेल्या ऑडिओमेसेजमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने कट रचला आहे. त्यासाठी त्याने मुस्ताक अहमद आणि मुस्ताक या दोघांना पंतप्रधानांच्या हत्येची सुपारी दिली आहे. या मेसेजमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांना हा मेसेज आला आहे. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावर्षी ऑगस्ट महिन्यातही ठार मारण्याची धमकी आली होती. तसा मेल ‘एनआयए’ला आला होता. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्यासाठी २० स्लीपर सेल तयार आहेत. त्यांच्याकडे २० किलो आरडीएक्स आहे, असे म्हटले होते. शिवाय ई-मेल पाठवणाऱ्याने आपले दहशतवाद्यांशी संबंध आहेत. या कटाचा खुलासा होऊ नये म्हणून आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर हा मेसेज आल्याने पोलिस हादरून गेले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -