
दोहा (वृत्तसंस्था) : सौदी अरेबियाने लिओनेल मेस्सीच्या संघाला पराभवाचा धक्का दिला. फुटबॉल विश्वचषकातील (FIFA World Cup) पहिल्याच सामन्यात अर्जेंटिनाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. क गटात सौदी अरेबियाने दोन वेळच्या चॅम्पियन अर्जेंटिनाचा २-१ असा पराभव केला.
१०व्या मिनिटाला कर्णधार मेस्सीने आघाडी घेतल्यानंतरही संघाला सामना जिंकता आला नाही. सौदी अरेबियाकडून सालेह अलसेहरीने ४८व्या मिनिटाला आणि सालेम अल्दवसारीने ५३व्या मिनिटाला गोल केला.
या पराभवासह अर्जेंटिनाची सलग ३६ सामन्यांची विजयी मालिका खंडित झाली आहे. यादरम्यान त्याने २५ सामने जिंकले आणि ११ सामने अनिर्णित राहिले होते. अर्जेंटिना आता २७ नोव्हेंबरला मेक्सिको आणि ३० डिसेंबरला पोलंडशी भिडणार आहे.
FIFA : फिफाचा ज्वर चढला…!
सौदी अरेबियाचा विश्वचषक इतिहासातील हा केवळ तिसरा विजय आहे. अर्जेंटिनाला आता प्री-क्वार्टर फायनलसाठी आपले उर्वरित दोन सामने जिंकावे लागणार आहेत.