
गुवाहाटी : आसाम-मेघालय (Assam-Meghalaya) सीमेवर मंगळवारी सकाळी पहाटे हिंसाचार झाला. या हिंसाचारात वनरक्षकासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आसाम पोलिसांकडून जंगलातील लाकडांची तस्करी करणाऱ्या एका ट्रकवर कारवाई केली जात असताना ही घटना घडली.
पोलिसांनी आसाम-मेघालय सीमेवर बेकायदेशीर लाकूड वाहून नेणारा ट्रक रोखल्यानंतर हा हिंसाचार झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून ४८ तासांसाठी सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. पश्चिम कार्बी आंगलाँगचे पोलीस अधीक्षक इमदाद अली यांनी ही माहिती दिली.
इमदाद अली यांनी सांगितले की, आसाम वन विभागाने मेघालय सीमेवर ट्रक थांबवला होता. ट्रकचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला रोखण्यासाठी वनरक्षकांनी गोळीबार केला. या गोळीबारात ट्रकचा टायर पंक्चर झाला. यानंतर वनरक्षकांनी ट्रक चालकासह तिघांना पकडले. मात्र, इतर पळून जाण्यात यशस्वी झाले.