Wednesday, July 9, 2025

Measles infection : बालकांप्रमाणे प्रौढांमध्येही गोवरची लागण

Measles infection : बालकांप्रमाणे प्रौढांमध्येही गोवरची लागण

मुंबई : मुंबईत गोवरची लागण (Measles infection) केवळ लहान मुलांमध्येच नसून प्रौढांमध्येही या संसर्गाची लागण होताना दिसत आहे. (Measles infection in adults as well as in children) एम पूर्व प्रभागामध्ये १८ आणि २२ वर्षांच्या दोघांची गोवराचे संशयित रुग्ण म्हणून पालिकेकडे नोंद करण्यात आली आहे. हे दोन्ही रुग्ण अंगावर पुरळ उठणे तसेच ताप येण्याच्या तक्रारीसाठी खासगी डॉक्टरांकडे गेले होते.


या रुग्णांना लक्षणाधारित उपचारासह अ जीवनसत्त्वाची मात्रा देण्यात आली. आता या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. मात्र गोवराच्या संसर्गाची लागण लहान बालकांप्रमाणे प्रौढांमध्येही होते का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. काही गंभीर लक्षणे दिसून आल्यास तातडीने रुग्णालयात जाणे महत्त्वाचे आहे.


जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निकषानुसार, ज्या भागामध्ये गोवराच्या संशयित रुग्णांमध्ये अंगावर पुरळ, ताप अशी लक्षणे दिसून येतात, अशा परिसरातील पाच नमुने वैद्यकीय विश्लेषणासाठी पाठवण्यात येतात. मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये पाचपैकी दोन नमुन्यांमध्ये गोवर असल्याचे निष्पन्न झाल्यास या परिसरात गोवराचा उद्रेक असल्याचे घोषित केले जाते. या परिसरामध्ये गोवराचा प्रादुर्भाव होत असल्याचे निश्चित झाल्यानंतर तेथील नमुने पुन्हा वैद्यकीय विश्लेषणासाठी पाठवण्यात येत नाहीत. त्यानंतर येणारे सर्व रुग्ण हे गोवरासाठी संशयित असल्याचे मानले जाते.


गोवंडी येथे प्रॅक्टिस करणाऱ्या डॉ. राजेशकुमार प्रजापती यांच्याकडे हे दोन्ही रुग्ण ताप व अंगावर पुरळ अशा तक्रारी घेऊन दोन दिवसांपूर्वी आले होते. या लक्षणांची नोंद घेतल्यानंतर यांना गोवराचे संशयित रुग्ण म्हणून पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले. तीन दिवसांपासून त्यांना ताप येत होता. त्यासाठी त्यांनी स्वतःच तापाच्या गोळ्या घेतल्या होत्या. गोवर झाल्यानंतर कडुलिंबाच्या पाल्याचा लेप लावणे, कापूर तेलात घालून तो त्वचेवर लावण्यासारखे अनेक घरगुती उपाय त्यांनी केले. मात्र तापाचा जोर वाढल्यानंतर ते डॉक्टरांकडे आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >