Wednesday, April 30, 2025

क्रीडामहत्वाची बातमी

FIFA World Cup : कतारच्या नावे नकोसा विक्रम

FIFA World Cup : कतारच्या नावे नकोसा विक्रम

दोहा (वृत्तसंस्था) : फिफा विश्वचषक (FIFA World Cup) स्पर्धेला रविवारपासून उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात यजमान कतारने पराभवाचा सामना करत नकोसा विक्रम आपल्या नावे केला आहे.

फिफा विश्वचषकाच्या ९२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच यजमान देश असणाऱ्या संघाने सलामीचा सामना गमावला आहे. अल बायत स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इक्वेडोरने यजमानांचा २-० असा पराभव केला. फिफा वर्ल्ड कप २०२२ची सुरुवात रविवारपासून झाली. जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धेतील पहिला सामना यजमान कतार आणि दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोर यांच्यात खेळला गेला. अल बायत स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इक्वेडोरने यजमानांचा २-० असा पराभव केला.

कतारपूर्वी २२ देशांनी फिफा विश्वचषकाचे आयोजन केले आहे. यापैकी १६ देश असे आहेत की त्यांना विश्वचषकातील पहिला सामना जिंकण्यात यश आले. तर ६ देशांनी वर्ल्डकपचा पहिला सामना ड्रॉ केला आहे. पण फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ९२ वर्षांच्या इतिहासात यजमानपद भूषवताना पराभव कोणीच पत्करलेला नाही. विशेष म्हणजे कतारचा संघ प्रथमच विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे.

Comments
Add Comment