Friday, July 19, 2024
Homeक्रीडाFIFA World Cup : इंग्लंडकडून इराणचा धुव्वा

FIFA World Cup : इंग्लंडकडून इराणचा धुव्वा

फिफा विश्वचषक स्पर्धा

दोहा (वृत्तसंस्था) : फिफा विश्वचषक (FIFA World Cup) स्पर्धेत इंग्लंडने धडाकेबाज सलामी दिली. इंग्लंडने इराणचा ६-२ असा मोठ्या फरकाने पराभव केला. इंग्लंडकडून बुकायो साकाने दोन गोल केले, तर रहीम स्टेर्लिंग, ज्यूड बेलिंगहम, मार्कस रॅशफोर्ड आणि जॅक ग्रिलीश यांनी प्रत्येकी १ गोल केला. इराणकडून मेहदी तारेमीने २ गोल दागले.

इंग्लंड आणि इराण यांच्यातील सामन्यात इंग्लंडने पहिल्यापासूनच सामन्यावर पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बॉल आपल्या नियंत्रणात ठेवत इराणच्या गोलपोस्टवर कायम दबाव निर्माण केला होता. दरम्यान, इराणचा गोलकिपर बैरानवांदच्या नाकाला दुखापत झाली. त्यामुळे दुसरा गोलकिपर मोसैनीला मैदानात पाचारण करण्यात आले. यानंतर इराणने आक्रमक पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र इंग्लंडने पुन्हा नियंत्रण मिळवत इराणच्या गोलपोस्टवर सातत्याने चाल केली. दरम्यान, इंग्लंडचे दोन प्रयत्न फसल्यानंतर ३५व्या मिनिटाला ज्यूड बेलिंगहमने हेडरद्वारे इंग्लंडसाठी पहिला गोल नोंदवला. त्यानंतर हाफ टाईमला काही मिनिटेच शिल्लक असताना बुकाओ साकाने डाव्या पायाने जोरदार फटका मारत ४३व्या मिनिटाला दुसरा गोल केला. यानंतर हाफ टाईमनंतर इंज्यूरी टाईममध्ये कर्णधार हॅरी केनने रहीम स्टर्लिंगला एक जबरदस्त पास दिला. यावर स्टर्लिंगने कोणतीही चूक न करत गोल करत इराणवरील आघाडी ३-० अशी नेली.

हाफाटाईमनंतर इंग्लंडने आपला गोलचा धडाका कायम ठेवला. इंग्लंडचा फॉर्वर्ड प्लेयर बुकायो साकाने आपला वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथा गोल केला. इंग्लंडने इराणवर चौथा गोल केल्यानंतर इराणने अवघ्या तीन मिनटात इंग्लंडला प्रत्युत्तर देत आपला सामन्यातील पहिला गोल नोंदवला. मेहदी तारेमीने घोलीजादेहच्या पासवर गोल करत संघाचे खाते उघडले. इराण आपल्या पहिल्या गोलचा आनंद साजरा करत असतानाच इंग्लंडने इराणवर ७१व्या मिनटाला पाचवा गोल दागला. मार्कस रॅशफोर्डने हॅरी केनच्या पासवर इंग्लंडचा पाचवा गोल केला. इंग्लंडचा फुटबॉलर जॅक ग्रिलीशने ८९व्या मिनिटाला इराणवर गोल करत इंग्लंडची गोलसंख्या ६ वर नेली. अखेर मेहदीला पेनाल्टी किक मिळाली आणि इराणने सामना दुसरा गोल करत संपवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -