Wednesday, July 2, 2025

Election Commissioner : अरुण गोयल भारताचे नवे निवडणूक आयुक्त

Election Commissioner : अरुण गोयल भारताचे नवे निवडणूक आयुक्त

नवी दिल्ली : माजी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी अरुण गोयल यांनी सोमवारी केंद्रीय निवडणूक आयुक्त (Election Commissioner) म्हणून पदभार स्वीकारला आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.


गोयल यांची शनिवारी निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्यासह ते निवडणूक आयोगाचा भाग असतील.


मे २०२२ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) म्हणून सुशील चंद्रांच्या निवृत्तीनंतर निवडणूक आयोगात एक जागा रिक्त होती. त्याच जागेवर आता अरुण गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


गोयल हे पंजाब केडरचे १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. १८ नोव्हेंबरला त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. ते ६० वर्षांचे झाल्यानंतर ३१ डिसेंबर २०२२ ला निवृत्त होणार होते.

Comments
Add Comment