Monday, July 15, 2024
Homeराशिभविष्यसाप्ताहिक राशिभविष्यHoroscope : साप्ताहिक राशिभविष्य

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य

साप्ताहिक (Horoscope) राशिभविष्य, दि. २० ते २६ नोव्हेंबर २०२२

योग्य परतावा मिळेल
मेष – हा आठवडा सर्व बाबतीत अथवा सर्व क्षेत्रांत आपली प्रगती करणारा ठरणार आहे. नोकरीत अनुकूल वातावरण लाभेल नोकरीतील घटना आपल्याला मोठा दिलासा देतील. आतापर्यंत केलेल्या कष्टाचे फळ मिळाल्यामुळे आपण आनंदात असाल मेहनतीचा योग्य परतावा मिळेल एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आपली निवड होऊ शकते ते परदेशगमनाचे योग. कलाकार, लेखक कवी यांना प्रसिद्धी मिळेल. कला डिझायनिंग सौंदर्यप्रसाधने या क्षेत्रातील मंडळींना प्रगती करता येईल. तुमचे विचार समोरच्यांना पटवून द्या. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील.
आनंदी व उत्साही राहाल
वृषभ – आपल्या आजूबाजूला काही सकारात्मक घटना घडल्यामुळे आपण आनंददायी आणि उत्साही राहाल आपल्या समोरील कामे वेगाने पूर्ण कराल. दीर्घकालीन रखडलेली कामे गतीमान होतील. विशेषतः जमीन जुमला, स्थायी संपत्तीविषयक असलेले व्यवहार जे थंडावलेले होते, ते गतिशील होऊन पूर्णत्वाकडे वाटचाल करतील. मध्यस्थी यशस्वी होऊन आर्थिक फायदा होऊ शकतो. आपले मार्गदर्शन इतरांना मिळेल. त्यामुळे आपल्या शब्दाला मान मिळेल. नोकरीत दिलासा मिळू शकतो. बढतीचे योग संभवतात. क्रीडा व तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील मंडळींना प्रगती करता येईल.
कामात यश मिळेल
मिथुन – या कालावधीत काही वेळेस नियोजन केलेले बदलावे लागेल तसेच काही कामांना विलंब लागू शकतो. विशेषतः सरकारी कामे तसेच जमीन, स्थावर संपत्ती या विषयीच्या व्यवहारांना वेळ लागू शकतो. नियोजित गाठीभेटी पुढे ढकलल्या जाऊ शकतात त्यामुळे निराशा येण्याची दाट शक्यता आहे. पण निराश होऊ नका. संयमाने प्राप्त परिस्थिती हाताळा. शांतपणे पुढील प्रयत्न केल्यास सर्व कामात यश मिळेल. नोकरीत दिलासा मिळेल. कौटुंबिक आघाडीवर अनुकूलता लाभेल. मंगलकार्यात सहभागी होण्याची शक्यता. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.
इच्छापूर्ती होईल
कर्क – बरेच दिवस मनात घर करून राहिलेली एखादी इच्छा अचानक पूर्ण होऊ शकते. राहत्या घराबद्दलचे प्रश्न, समस्या सुटतील. आपल्या स्वतःच्या मालकीचे घर असावे, असे बरेच दिवसापासून आपल्या मनात येत असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून केलेले प्रयत्न सफल होतील, पैशाची सोय होईल. तसेच पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखती यशस्वी झालेल्या दिसतील. नोकरीसाठी बोलावणं येईल. बेरोजगारांचा रोजगाराविषयीचा प्रश्न सुटेल. व्यवसाय-धंद्यात प्रगती करू शकाल. वाहन खरेदी-विक्री, शेती, तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना हा काळ मध्यम स्वरूपाचा राहील. कौटुंबिक वातावरण सुखद राहील.
धनलाभ होईल
सिंह – या आठवड्यात आपल्याला निरनिराळ्या सभा-समारंभांची आमंत्रणे मिळू शकतात. एखाद्या महत्त्वाच्या समारंभात उच्चपद अथवा सन्माननीय पद मिळेल. लोक संग्रहात वृद्धी होऊन गुरुतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शनाबरोबर सहाय्य मिळू शकते. समाजातील मान्यवरांचे परिचय होतील, त्यांचा सहवास लाभेल. मानसन्मान वाढून प्रतिष्ठा वाढेल. पुष्कळशा बाबतीत अनुकूलता लाभल्याने अपेक्षित गोष्टी साध्य होतील. विशिष्ट व्यक्तींचे परिचय झाल्यामुळे लाभ घेता येईल. सरकारी नियमांचे पालन करा.
उत्पन्नात वाढ होईल
कन्या – निरनिराळ्या मार्गांनी धनलाभ झाल्याने आर्थिक परिस्थिती चांगली राहील. नेहमीच्या उत्पन्नाच्या मार्गाने व्यतिरिक्त इतर मार्गांनीही धनलाभ होऊ शकतो. पूर्वी केलेल्या कामाचे फळ मिळू शकते. त्यामुळे आनंदी आणि उत्साही राहाल नवीन कामे अथवा नवीन नियोजन मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हाती घ्याल. नोकरदारांना नोकरीमध्ये शुभवार्ता मिळू शकतात परदेशगमन होऊ शकते. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. उत्पन्नात वाढ होईल. व्यवसायातील स्थिती समाधानकारक राहील. उलाढाल वाढेल.
विशेष प्रयत्नांची गरज
तूळ – हा आठवडा सर्वसामान्य जरी असला तरी काही वेळेस आपल्या मनाविरुद्ध घटनांना सामोरे जावे लागणार आहे. आयत्यावेळेस अडचणी उद्भवू शकतात तसेच कुटुंबात अथवा व्यवसाय धंद्यात वादविवादाचे प्रसंग येऊ शकतात. आपल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी अथवा कुटुंबात वादविवाद टाळणे हिताचे ठरेल. मित्रमंडळींच्या वर्तुळात मतभेद संभवतात. नोकरदारांना वरिष्ठांशी जुळवून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहणे आवश्यक आहे.
नवीन जबाबदाऱ्या वाढतील
वृश्चिक – बदलत्या परिस्थितीनुसार कुटुंबात, व्यवसाय-धंद्यात काही बदल घडतील. बदलत्या परिस्थितीनुसार व्यवसाय-धंद्यातील अथवा कुटुंबातील परिस्थिती बदलल्यामुळे नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. सरकारी नोकरीत जबाबदाऱ्या पडतील. आपल्या अधिकारातील वृद्धी होईल. मात्र आपल्या अधिकाराचा वापर जाणीवपूर्वक करणे हिताचे ठरेल. विद्यार्थी वर्गाला हा काळ उत्तम राहील. व्यापार व नोकरीत प्रगती करण्याची संधी मिळेल. बहुतेक क्षेत्रात प्रतिमा उजळेल. कलाक्षेत्राला चांगला वाव मिळेल.
नोकरदारांना दिलासा मिळेल
धनु – या आठवड्यात आपल्या स्वभावाला जरा मुरड घालणे आवश्यक आहे. चांगल्या, सकारात्मक विचार असलेल्या लोकांच्या सहवासामुळे स्वतःही सकारात्मक राहू शकाल. महत्त्वाचे काम होईल. सकारात्मक दृष्टीने वागल्यास अपेक्षित गोष्टी साध्य होतील. दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. नोकरदारांना दिलासा मिळेल. नोकरी-व्यवसायात काही चांगले बदल घडून व्यवसाय नोकरीत धंद्यात प्रगती कारक कालावधी सुरू होईल. मनोरंजन, हॉटेल, ज्वेलर्स या क्षेत्रात विशेष प्रगती करता येईल.
भाग्योदय होईल
मकर – नेहमीची आजूबाजूची परिस्थिती बदलेल. सकारात्मक घटना घडल्यामुळे उत्साही आणि आनंदात राहाल. त्याच उत्साहात आपण नवीन कामे हाती घ्याल. कार्यात गतिमानता येईल. आपण केलेल्या प्रयत्नांना उत्तम प्रतिसाद मिळून कामे पूर्ण होतील. नोकरदारांना वरिष्ठांशी जुळवून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील तसेच हाताखालील सहकाऱ्यांचे सहकार्य मिळवण्यासाठीही स्वतःवर संयम ठेवणे आवश्यक राहील. कामानिमित्त प्रवास करावे लागतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होऊन कुटुंबात मंगलकार्य घडेल. तरुण-तरुणींचा भाग्योदय होऊ शकतो.
आव्हानांकडे संधी म्हणून पाहा
कुंभ – या आठवड्यात आपल्याला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. या आव्हानांकडे आपण एक संधी म्हणून पाहा. त्याचा आपल्याला आपल्या भविष्यात फायदा होईल. व्यवसाय-धंदा नोकरीत नवीन जबाबदाऱ्या पडतील त्या पूर्णपणे प्रामाणिकपणे पार पाडल्यास त्याचे फळ निश्चितच आपल्याला मिळेल. आपल्या कामामध्ये अद्ययावत राहण्याची आवश्यकता आहे तसेच नोकरीच्या ठिकाणी राजकारण व गटबाजीपासून दूर राहा. आपल्या मित्राकडून आपल्याला सर्वच क्षेत्रांत मदत मिळेल.
नोकरी मिळेल
मीन – या आठवड्यात विविध क्षेत्रांत आपल्याला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. नोकरीच्या बाबतीत नोकरी बदलायची असेल, तर त्या दृष्टीने प्रयत्न केल्यास यशस्वी होईल. अधिक चांगल्या पॅकेजची नोकरी मिळू शकते. तसेच ज्यांना नोकरी नाही अशांना नोकरी मिळेल. नोकरीविषयक पूर्वी दिलेल्या मुलाखती फलद्रूप होतील. व्यवसाय धंद्यात नवीन संकल्पनांचा वापर यशस्वी ठरेल. कलाकार, साहित्यिक, खेळाडूंना नवीन संधी मिळू शकतात. ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. राजकीय क्षेत्रातील जातकांना हा कालावधी गतिशील राहील. कुटुंबात वादविवाद नको.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -