Tuesday, July 1, 2025

World Swimming : सोलापूरची कीर्ती भराडिया जलतरणाच्या विश्वविक्रमासाठी सज्ज

World Swimming : सोलापूरची कीर्ती भराडिया जलतरणाच्या विश्वविक्रमासाठी सज्ज

सोलापूर (वार्ताहर) : सोलापूरमधील कीर्ती नंदकिशोर भराडिया (वय १६ वर्षे) ही जलतरणपटू (World Swimming) अरबी समुद्रात ३६ किलोमीटरचे अंतर न थांबता पोहून पूर्ण करीत विश्वविक्रमाला गवसणी घालणार आहे.


गुरुवार २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुंबईलगतच्या अरबी समुद्रात वरळी सी लिंक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंतचे अंतर सलग आठ ते दहा तास पोहून पूर्ण करणार आहे.


कीर्ती भराडीया गेल्या सात ते आठ महिन्यांपासून सोलापूरमधील मार्कंडेय जलतरण तलाव येथे सहा ते सात तास सराव करत आहे. कीर्तीला प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. उत्तम आहार घेण्याकरिता डॉक्टर सोनाली घोंगडे यांचे कीर्तीला मार्गदर्शन मिळाले आहे. साहस व विक्रमाचे परीक्षण करण्याकरिता वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे अधिकारी पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत.


तिच्या पूर्णवेळ पोहण्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. स्विमिंग असोसिएशन व रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्याकडून विविध प्रकारच्या परवानग्या घेतल्या आहेत. सात ते आठ महिन्यांपासून कीर्ती भराडीया हिने मुंबईमध्ये अरबी समुद्रात पोहण्याचा सराव केला आहे. विश्वविक्रम पूर्ण करण्याकरिता तिला पोहताना खारे पाणी, ऊन, समुद्रातील उलट लाटा, सायंकाळी अंधार अशा अडचणींवर मात करावी लागणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >