
मुंबई : रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची मुलगी ईशा अंबानीच्या घरी दोन चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. ईशाने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे नावेदेखील जाहीर करण्यात आली आहेत. ईशा आणि आनंद पिरामल यांना ट्विन्स झाल्याने आता सोशल मीडियावर अनेक जण त्यांना शुभेच्छा देत आहेत. ईशा अंबानीने जुळ्या मुलांना जन्म दिला, ज्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
Cold force : राज्यात हुडहुडी वाढणार
ईशा आणि आनंद यांनी त्यांच्या मुलाचे नाव कृष्णा असे ठेवले आहे. तर मुलीचे नाव त्यांनी आदिया ठेवले आहे. एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे अंबानी कुटुंब आणि पिरामल कुटुंबाने ही बातमी दिली आहे.