Sunday, August 31, 2025

Twitter : डोनाल्ड ट्रम्प यांची ट्विटरवर पुन्हा एंट्री!

Twitter : डोनाल्ड ट्रम्प यांची ट्विटरवर पुन्हा एंट्री!

नवी दिल्ली : ट्विटरचे (Twitter) नवीन मालक एलॉन मस्क यांनी जबाबदारी स्वीकारताच, या प्लॅटफॉर्मवर अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते पुनर्संचयित करण्याबद्दल चर्चा सुरू झाली. त्यासाठी त्यांनी शनिवारपासून मतदानालाही सुरुवात केली. रविवारी मतदान संपल्यानंतर ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा दिसले, मात्र बहुमतानंतरही आता ट्विटरवर परतण्यात रस नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी स्पष्ट केले.

ट्वीटरचे मालक एलॉन मस्क यांनी १९ नोव्हेंबर रोजी ट्वीट करत डोनाल्ड ट्रंप यांचे ट्वीटर अकाउंट पुर्ववत सुरू करण्याबाबत लोकांची प्रतिक्रिया जाणून घेतली होती. त्यासाठी त्यांनी पोल द्वारे 'हो किंवा नाही' मध्ये उत्तर मागितले होते. त्यावर पन्नासहून अधिक टक्के लोकांनी हो असे उत्तर दिले होते. त्यामुळे आता डोनाल्ड यांचे ट्वीटर अकाउंट पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रक्षोभक ट्विटमुळे जानेवारी २०२१ मध्ये ट्विटरवरील त्यांच्या अकाऊंटवर बंदी घालण्यात आली होती.

Comments
Add Comment