Saturday, July 13, 2024
Homeताज्या घडामोडीKishori Pednekar : किशोरी पेडणेकर यांना एसआरएचा दणका

Kishori Pednekar : किशोरी पेडणेकर यांना एसआरएचा दणका

किरीट सोमय्यांच्या तक्रारीची दखल

मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना एसआरएने दणका दिला आहे. (Kishori Pednekar slapped by SRA) पेडणेकर यांच्या वरळीतील चार सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश एसआरएने मुंबई महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्यासाठी हा पहिला मोठा झटका आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर एसआरएने हे आदेश दिले.

किशोरी पेडणेकर यांनी त्यांची कंपनी कीश कॉर्पोरेशनच्या माध्यमातून वरळी गोमाता जनता एसआरए प्रकल्पातील ४ सदनिका बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतल्या होत्या, अशी तक्रार भाजप नेते किरीट सोमय्यांनी केली होती. एसआरएने सोमय्यांची ही तक्रार स्वीकारत हे चार गाळे ताब्यात घेत असल्याचे आदेश दिले आहेत. पुढील ४ दिवसांत मुंबई मनपा अधिकारी हे गाळे रिकामे करून एसआरएच्या ताब्यात देतील, असे सोमय्यांनी म्हटले आहे.

सोमय्या यांनी पेडणेकर यांच्या चार सदनिकांविषयी एसआरएमध्ये तक्रार केली होती. पेडणेकर यांनी या सदनिका बळकावल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांच्या बेनामी सदनिकांवर कारवाई करा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर एसआरएने महापालिकेला हे आदेश दिले आहेत. एसआरए अधिकार्‍यांनी किशोरी पेडणेकर, किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस आणि बेनामी सहकारी विरुद्ध कलम ३ए अंतर्गत या सदनिकांचे निष्कासन करण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच पेडणेकर यांनी गोमाता जनता एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील इमारत क्रमांक २ मध्ये अवैधरित्या सदनिका क्रमांक ६०१ चा कब्जा घेतला असून सदर सदनिका अधिकृतपणे गंगाराम विरय्या बोगा यांना वितरीत झाले होते. सदर प्रकरणी वितरणाच्या अटी व शर्थींचे उल्लंघन केल्याने सदर सदनिका एसआरएने ताब्यात घेण्यासाठी महापालिकेला पत्र दिले आहे.

संबंधित बातम्या…

एसआरए घोटाळाप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी

महापौर किशोरी पेडणेकरांनी एसआरए फ्लॅटमध्ये थाटले कॉर्पोरेट ऑफिस किरीट सोमैय्या यांचा आरोप

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -