Thursday, July 25, 2024
HomeदेशNitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना मानद डॉक्टरेट प्रदान

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना मानद डॉक्टरेट प्रदान

औरंगाबाद : केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींना (Nitin Gadkari) छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२व्या दीक्षांत समारंभात मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

देशातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल नितीन गडकरींना (Nitin Gadkari) ही मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.महाराष्ट्राचे राज्यपाल आणि कुलपती भगत सिंह कोशियारी यांनी राज्यसभा खासदार शरद पवार, डॉ. विजय भटकर, कुलगुरू, नालंदा विद्यापीठ, डॉ. प्रमोद जी. येवले, कुलगुरू आणि डॉ. श्याम शिरसाठ, प्र-कुलगुरू यांच्या उपस्थितीत मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. नितीन गडकरींच्या कार्यालयाने ट्वीटर द्वारे माहिती दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -