Friday, October 24, 2025
Happy Diwali

Uddhav Thackeray : राहुल गांधींच्या वक्तव्यापासून उद्धव ठाकरेंची फारकत

Uddhav Thackeray : राहुल गांधींच्या वक्तव्यापासून उद्धव ठाकरेंची फारकत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्वा. सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याशी आपण असहमत आहोत, असे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. उद्या शुक्रवारी राहुल गांधी यांची शेगाव येथे होणाऱ्या जाहीर सभेलाही ते हजर राहणार नाहीत. तसेही त्यांनी या पत्रकार परिषदेनंतर काही पत्रकारांना सांगितले.

सावरकर यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. त्यांचा आम्हाला नितांत आदर आहे. पण ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या स्वातंत्र्यलढ्यातच भाग घेतला नाही. त्यांच्या पिलावळीने आम्हाला याबाबत जाब विचारावा, याचेच आश्चर्य वाटते, असे ते म्हणाले.

शिवसेनाप्रमुख केवळ शिवसेनाप्रमुख नव्हते, त्यांच्यामध्ये विविध पैलू होते. आजचा हा स्मृतिदिन मला थोडासा वेगळा वाटतो. कारण, दहा वर्षे लागली. काहीजणांना शिवसेनाप्रमुख गेल्यानंतर ते कोण होते? हे समजायला. आता शिवसेनाप्रमुखांबद्दलचा त्यांचा उमाळा बाहेर आला आहे. अनेक शिवसेनाप्रेमी आहेत, शिवसेनाप्रमुखप्रेमी आहेत. त्यांनीही त्यांचे प्रेम आणि भावना व्यक्त करायला काही हरकत नाही. मात्र ते करताना याचा कुठे बाजार मांडू नये, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >