Sunday, October 26, 2025
Happy Diwali

Nitin Gadkari : नितीन गडकरी यांची तब्येत बिघडली

Nitin Gadkari : नितीन गडकरी यांची तब्येत बिघडली

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील डागापूरमधील कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची तब्येत एका कार्यक्रमादरम्यान अचानक बिघडली.

जवळच्या रुग्णालयाचे पथक कार्यक्रमस्थळी पोहोचले आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. सध्या नितीन गडकरी यांची प्रकृती ठीक आहे.

Comments
Add Comment