Tuesday, June 17, 2025

Murud : मुरूड-एकदरा परिसराला विषारी वायूचा विळखा

Murud : मुरूड-एकदरा परिसराला विषारी वायूचा विळखा

संतोष रांजणकर


मुरूड : मुरूड-एकदरा (Murud) परिसराला सध्या विषारी वायूचा विळखा पडला आहे. पहाटेच्या वेळी धुक्याऐवजी प्लॅस्टिकच्या विषारी धुराची चादर पसरत आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉक घेणाऱ्यांना ऑक्सिजन ऐवजी प्रदुषित विषारी वायुचा श्वास घ्यावा लागतो आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.


या परिसरात सध्या भंगारवाले मोठ्या प्रमाणात केबल जमा करून यातील तांब्याच्या (कॉपर) तारा काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाळ करत आहेत. त्यामुळे या जाळेतून येणाऱ्या विषारी वायू मुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहेत. या धुराचे प्रमाण इतके असते की संपुर्ण परिसरात धुक्याऐवजी विषारी धुराची चादर पसरलेली पहावयास मिळत आहे.


पहाटे स्वच्छ हवेत ऑक्सिजन मिळवण्यासाठी अनेक नागरिक व ग्रामस्थ फिरण्यासाठी बाहेर पडत असतात. यावेळी नागरिकांना ऑक्सिजन ऐवजी प्रदुषित विषारी प्लॅस्टिक धुराचा श्वास घ्यावा लागतो आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी व ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. आणि या प्रदूषण करणाऱ्या भंगारवाल्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Comments
Add Comment