Wednesday, July 2, 2025

Vikram S : भारताचे पहिले खासगी रॉकेट विक्रम-एस लाँच

Vikram S : भारताचे पहिले खासगी रॉकेट विक्रम-एस लाँच

श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) अर्थात इसरो (ISRO) आज आणखी एक इतिहास रचला आहे. भारताचे पहिले खासगी रॉकेट विक्रम-एस (Vikram S) आज सकाळी ११.३० वा. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अंतराळात प्रक्षेपित झाले. या सिंगल-स्टेज रॉकेटची निर्मिती भारतीय स्टार्टअप स्कायरूट एअरोस्पेसने केली आहे. ही एक प्रायोगिक मोहीम असून, त्याद्वारे ३ पेलोड्स पृथ्वीपासून सुमारे १०० किमी नेण्यात आले.


Vikram S

आज भारताने पहिले खासगी रॉकेट (Vikram S) लाँच केले. भारतासाठी हे फार मोठे आणि महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे अवकाशात भारतासाठी नवा अध्याय सुरु झाला आहे. हे रॉकेट १०० किलोमीटर उंचीवर पोहोचणार आहे.


श्रीहरीकोटामधून आज इसरोने पहिल्या खासगी रॉकेटचं (Vikram S) प्रक्षेपण केले. विक्रम-सबऑरबिटल रॉकेट असे या रॉकेटचे नाव आहे. स्कायरूट एयरोस्पेस प्राइवेट लिमिटेड या खासगी कंपनीने या रॉकेटची निर्मिती केली आहे. ५५० किमी वजनाचे हे सिंगल स्टेज स्पिन स्टेबलाइज्ड सॉलिड प्रोपेलेंट रॉकेट आहे. आज उड्डाण केल्यानंतर हे रॉकेट सुमारे १०० किलोमीटरपर्यंत झेप घेईल आणि त्यानंतर समुद्रात कोसळेल. केंद्रीय अंतराळ मंत्री डॉ. जितेंद्र सिंह या प्रक्षेपणावेळी उपस्थित होते.



संबंधित बातम्या...


आता अंतराळात होणार खासगी क्षेत्राचा प्रवेश; इस्त्रोची तयारी


अंतराळ ‘स्टार्टअप्स’ला मिळणार बळ


विशेष लेख : इस्रोची अंतराळातील व्यावसायिक क्षेत्रात उडी!

Comments
Add Comment