नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विश्वचषक स्पर्धेत दमदार गोलंदाजी (bowler ranking) करणाऱ्या अर्शदीप सिंगने गोलंदाजांच्या टी-२० क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमावारीनुसार, अर्शदीप सिंग २२व्या स्थानावर पोहचला आहे.
टी-२० विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार जिंकलेल्या सॅम करनला आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. सॅम करनला ११ क्रमांकाचा फायदा झाला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीनेही आयसीसी रँकिंगमध्ये झेप घेतली आहे. आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये शाहीन आफ्रिदी १८व्या स्थानावर पोहचला आहे.
जो आधी ३८व्या स्थानावर होता. त्याचबरोबर धनंजय डी सिल्वा आणि बेन स्टोक्स यांना अष्टपैलूंच्या क्रमवारीत फायदा झाला आहे. या स्पर्धेत श्रीलंकेचा अष्टपैलू धनंजय डी सिल्वाने १७७ धावा आणि ६ विकेट्सही आपल्या नावावर केल्या. या शानदार कामगिरीनंतर श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू क्रमवारीत ३०व्या क्रमांकावर आला. तर पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरलेला बेन स्टोक्स ४१व्या स्थानावर पोहोचला आहे.