डकार (वृत्तसंस्था) : फुटबॉलचा महाकुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषकापूर्वी (FIFA World Cup) सेनेगलला धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार आणि स्टार फॉरवर्ड सादिओ माने दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
सेनेगलने शुक्रवारी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, दुखापतीमुळे सादिओ मानेला विश्वचषक संघाबाहेर जावे लागले आहे. टीमचे डॉक्टर मॅन्युएल अफोंसो म्हणाले, ‘बायर्न म्युनिकचा फॉरवर्ड सॅडिओ माने वर्ल्ड कपमध्ये सेनेगलसाठी उपलब्ध असणार नाही.
माने विश्वचषकातील काही सामने खेळेल, अशी आशा अफोंसो यांनी व्यक्त केली होती. मात्र ‘आम्ही आजचा एमआरआय पाहिला आहे आणि दुर्दैवाने त्याची रिकव्हरी अपेक्षेप्रमाणे होणार नाही, असे अफोंसो म्हणाले.
३० वर्षीय सादिओ मानेच्या दुखापतीमुळे सेनेगलला धक्का बसला आहे. तो जगातील सर्वोत्तम फॉरवर्ड्सपैकी एक मानला जातो. त्याच वेळी, आफ्रिकन देश सेनेगल हा अशा संघांपैकी एक आहे, जो मोठ्या संघांना पराभूत करून स्पर्धेत मोठा उलटफेर करू शकतो.