बीजिंग (वृत्तसंस्था) : भारतीयांचे उत्तेजक पेय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महागड्या चहाची (tea) किंमत ऐकून धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. एका खास चहा पावडरच्या एक किलोच्या पॅकेटची किंमत तब्बल ९ कोटी रुपये आहे. जगातील हा महागडा चहा चीनमध्ये मिळतो.
जगातील सर्वात महाग चहा पावडर चीनमध्ये मिळते. या चहा पावडरचे नाव डा-होंग पाओ टी आहे. चीनमधील फुजियानमधील वुईसन भागात ही चहा पावडर मिळते. विशेष म्हणजे ही चहा पावडर याच भागात मिळते. इतर कोणत्याही ठिकाणी मिळत नाही. या चहा पावडरची किंमत प्रति किलो ९ कोटी रुपये आहे.
ही चहा पावडर दुर्मिळ झाली आहे. चीनमध्ये या चहा पावडरची मोजकीच झाडे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून वर्षभरात अतिशय कमी प्रमाणात चहा पावडर मिळते. डा-होंग पाओ टीची पाने अतिशय कमी असतात. काही ठिकाणी ग्राहक १० ग्रॅम चहा पावडरसाठी १० ते २० लाख रुपये मोजतात. सामान्य चहाप्रमाणे या चहाचे उत्पादन घेतले जात नाही. एका विशिष्ट झाडातूनच चहा पावडर निवडली जाते.
Artemis-1 : आर्टेमिस-१ ने टिपले पृथ्वीचे अप्रतिम छायाचित्र
चीनच्या जीवनशैलीत चहाचे एक वेगळे स्थान आहे. काही प्रकारचे चहा हे आरोग्यदायी, आजारांवर परिणामकारक ठरतात, असे चीनमध्ये म्हटले जाते. चीनमध्ये मिळणारी ही महागडी चहा पावडरदेखील आरोग्यदायी असल्याचे म्हटले जाते. या चहा पावडरमुळे अनेक गंभीर आजार बरे होत असल्याचे म्हटले जाते.